*काव्यनिनाद साहित्य मंच, पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री सौ.स्वाती गोखले लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रश्नच प्रश्न*
नकळत पुन्हा अश्रू,का ओघळले गाली
देवाने आठव दिला,संचितांच्या सुंदर पखाली….
ओल्या तृणपात्यांवर जसे, दवबिंदू चमचम करती
अळवावरल्या थेंबांचे असे, आयुष्य अल्प ते किती….
आयुष्य उपभोगून झाले,जुळली आपुली नाती
तरीही का अधुरी,आपुल्या नात्यातील प्रीती….
देवाने दिधले मजला,जे हवे होते ते सर्व
तरीही डोळा का पाणी,संपता हे जीवनपर्व….
असेल का हे सुख,जे नाही पेलता येत
का हेच मनीचे शल्य,ते सावरून घेता येतं….
कधीच नव्हते पडले, आयुष्यात असे प्रश्न
पिंगा धरुन भोवताली,उभी ती प्रश्नचिन्ह ??????
सौ.स्वाती गोखले.
पुणे.