सावंतवाडी
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय मधील (इयत्ता पाचवी ते नववी) च्या विद्यार्थ्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने संरक्षणाविषयी माहिती देण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे व पोलीस हवालदार श्री.नाईक यांचे स्वागत केले. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्यामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले अनुक्रमे तीन मानस महेंद्र कोरगावकर, श्रेया नरेंद्र होडावडेकर, साईप्रसाद संतोष शेडगे या विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक श्री मेंगडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक श्री मेंगडे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी, मोबाईल सेक्युरिटी मोबाईल ॲप्लिकेशन वापरणे, पोक्सो कायदा,कोविड -१९ मधील ऑनलाईन शिक्षणमुळे मोबाइलच्या अतीवापरामुळे झालेले दुष्परिणाम व फायदे, संरक्षणाच्या मूलभूत विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाच्यावेळी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पोलीस विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिलेली माहिती विद्यार्थी निश्चितच अंगीकारतील अशी ग्वाही मुख्याध्यापक यांनी दिली व सावंतवाडी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.