सिंधुदुर्गनगरी
फेब्रुवारी – मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ 12 वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए.टी.के.टी साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर – डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येत आहे. या परीक्षांचे वेळापत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. सदर वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ 10 वी) च्या लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते शनिवार दिनांक 5 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहेत. तर उच्च माध्यमिक प्रमापत्र ( इ 12 वी ) सर्वसाधआरण व द्विलक्षी विषय, लेखी परीक्षा शुक्रवारी दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2020 या कालावधीत तर 12 वी च्या व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते सोमवार दिनांक 7 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहेत.
इयत्ता 10 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर 2020 ते शनिवार दिनांक 5 डिसेंबर 2020 व 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर 2020 ते गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजीपासून उपलब्ध आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खाजगी छपाई केलेले, तसेच व्हॉट्स ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये याची विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी नोंद घ्यावी असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे हे कळवितात.