दिशाभूल कराल तर मंत्रांच्या घरावर मोर्चे निघतील; रुपेश राऊळ यांचा इशारा
सावंतवाडी
चार ते पाच कॅबिनेट मंत्री असताना, सिंधुदुर्गात खाजगी कंपन्या आणून रोजगार मेळावा घ्यावा लागतो, हा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आहे. अशी टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. किती जणांना नियुक्ती पत्रे मिळाली, असा सवालही त्यांनी केला.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हा प्रमूख चंद्रकांत कासार, ऋतिका दळवी आदि उपस्थित होते.
सवंग लोकप्रियतेसाठी तरुणांना रोजगार देणार, जिल्हाचा सर्वांगीण विकास करणार असे भावनिक बोलून जनतेची दिशाभूल केली जातेय. यावेळी रुपेश राऊळ यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली.
याद राखा, यापुढे मतदानासाठी जनतेची दिशाभूल कराल तर, मंत्रांच्या घरावर मोर्चे काढावे लागतील असा इशाराही रुपेश राऊळ यांनी दिला.