*रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू*
कनिष्ठ बंधू नाम. उदय सामंत राजकारणात सक्रिय असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेले किरण उर्फ भैय्या सामंत हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूरच असायचे. परंतु गेल्या काही वर्षात नाम.उदय सामंत यांच्याबरोबरच राजकीय पटलावर किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव सुद्धा झळकू लागले. किरण उर्फ भैया सामंतांचे राजकारणात नाव येण्यापूर्वी नेहमीच पडद्यामागे राहून राजकीय हालचाली करणारे मुख्य सूत्रधार अशीच त्यांची ओळख होती. नाम.उदय सामंत यांच्यासाठी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यशस्वीपणे राजकीय रणनीती आखणे आणि अगदी विरोधकांनाही आपलेसे करणे यात किरण सामंत यांचा हातखंडा आहे. मतदार संघातील विकास कामांचे नियोजन करताना आपले कार्यकर्ते आणि विरोधकांची ही कामे समतोल राखून करत असल्यामुळे त्यांची कार्यपद्धती सर्वांच्याच पसंतीची राहिली आहे. नाम.उदय सामंत हे रत्नागिरीतून तब्बल चार वेळा आमदार तर तीन वेळा मंत्री झाले, त्यावेळी त्यांचा मतदार संघ त्यांच्या मागे एक हाती सांभाळून ठेवण्यात भैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या वाखाण्याजोगी कार्यपद्धतीमुळे भैय्या सामंत हे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ मध्ये उलथापालथ झाली व महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनानंतर रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी किरण उर्फ भैय्या सामंत यांची होर्डिंग झळकू लागली आणि तेव्हापासूनच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे भावी उमेदवार म्हणूनही किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव पुढे येईल अशी शक्यता निर्माण झाली.
कोकणच्या विकासासाठी रत्नसिंधू समृद्धी योजनेची नाम. दीपक केसरकर यांची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली व रत्नसिंधू समृद्धी योजनेच्या सदस्यपदी श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांची वर्णी लावत राजकारणात त्यांची एन्ट्री निश्चित केली. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर पासून गुहागर पर्यंत भैया सामंत यांचा मोठा चाहता वर्ग आहे. गुहागर तालुक्यातील भैय्या सामंत यांचा संपर्क लक्षात घेता कदाचित भास्कर जाधव यांच्यासमोर ते नक्की तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता वाटते. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघातूनही किरण उर्फ भैय्या सामंत यांना आगामी विधानसभेचे तिकीट दिले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
काही महिन्यापूर्वी किरण उर्फ भैया सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील काही कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली होती. कमी बोलणे व जास्त काम करणे ही किरण सामंत यांची स्टाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या दौऱ्यात अनेकांनी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील रहिवासी असलेले किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अशा या कार्यकर्ते व जनतेच्या पसंतीस उतरलेल्या किरण उर्फ भैय्या सामंत यांचा आज वाढदिवस…! किरण उर्फ भैय्या सामंत यांना संवाद मीडियाकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि भावी राजकीय वाटचालीला सदिच्छा….