You are currently viewing एकटा चालत रहा…*

एकटा चालत रहा…*

*वक्रतुण्ड साहित्य समूहाचे सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा. डॉ.सतीश शिरसाठ लिखित अप्रतिम काव्य अनुवाद*

*एकटा चालत रहा…*
(रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या ‘ एकला चलो रे’ या प्रसिद्ध कवितेचा मुक्त अनुवाद)

जेव्हा,
ते तुझी हाक ऐकत नसतील
तेव्हा,
एकटाच चालत रहा. जेव्हा,
ते भयभीत असतील
अरे अभाग्या –
तेव्हा,
तू मनाची कवाडं उघड
आणि
एकटाच स्वतःशी बोल.
जेव्हा,
काटेरी रस्त्यावर ते
तुझी साथ सोडून दूर जातील
अरे अभाग्या-
तेव्हा ,
रक्तरंजित पावलांनी
एकटाच
काट्यांना तुडवत जा.
अरे अभाग्या –
जेव्हा,
रात्र काळी आणि तुफानी असेल
तेव्हा,
तुझ्या हृदयाची ज्योत
प्रज्वलित कर.
………
@ प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

प्रतिक्रिया व्यक्त करा