*स्वराज्य लेखनी मंचचा,पहीला वर्धापन दिनानिमित्त “आॉनलाईन साहित्य संमेलन सोहळा, संपन्न….*
शहापूर — वैविध्यपूर्ण साहित्यलेखन स्पर्धा, आणि नवनवीन ऊपक्रमाचे माध्यमातून “स्वराज्य लेखनी मंच,,समुहाचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त “आॉनलाईन साहित्य संमेलन “सोहळा नुकताच संपन्न झाला.. अगदी अल्पावधीतच देशांत नव्हे तर देशाबाहेरच्या साहित्यिकांमध्ये लोकप्रिय झालेला हा समुह वैविध्यपूर्ण अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करित असतो. नुकत्याच एक वर्षात पदार्पण करित असताना,समुहातर्फे वर्धापन “दिनानिमित्त आॉनलाईन साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते, सुप्रसिद्ध साहित्यिक मधुसूदन घाणेकर, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संमेलनांत,कवि,मनोहर वाळिंबे व सचिन मुळे मान्यवर म्हणून उपस्थित होते.,समुह संस्थापक प्रकाश फर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली, समुहप्रशासिका कवयत्री,प्रितीजी वानखेडे व राजश्री मराठे ह्यांनी अगदी बहारदार सुत्रसंचलन करुन कार्यक्रम बहारदार केला.. कवयत्री सुनिता कपाळे ह्यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. स्वलिखीत कवितां सादरीकरणासाठी हिरिरिने भाग घेवुन साहित्यीकांनी कार्यक्रमांत रंगतदार केला.अशा रितिने प्रचंड ऊत्साही,साहित्यिकांच्या सहभागातुन संमेलन यशस्वी झाले.. संमेलनासाठी उपस्थित असलेल्या सर्व साहित्यिक, कवी, तसेच समुहात सतत लेखन करणारे लेखन आणि परीक्षा करणारे मान्यवर ह्या सर्वांना डिजिटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे समुह संस्थापक प्रकाश फर्डे यांनी सांगितले..
जगन्नाथ खराटे-ठाणे…