कणकवली
मराठी माणसाने उद्योग क्षेत्रात प्रगती करावी. उद्योजक व्हावे, त्या उद्योग – व्यवसायांचे मार्गदर्शन आणि प्रबोधन व्हावे. उद्योजक घडण्यासाठी लागणारी मेहनत,आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठीच हा पर्यटन महोत्सव आहेत. मनोरंजना बरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. शहराला आणि जिल्ह्याला आर्थिक सुबत्ता आली पाहिजे यासाठी कणकवलीचा पर्यटन महोत्सव आहे.या महोत्सवातून देशाच्या उद्योग क्षेत्राला अदानी, अंबानी सारख्या श्रीमंत उद्योजकांप्रमाणे उद्योजक मिळतील, असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
१९९० ची जिल्ह्याची परिस्थिती काय होती फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते, कसाल ते मालवण रस्त्यावर तर चालता येत नव्हते. १६ तास मुंबईला जायला लागायची. आज तोच सिंधुदुर्ग जिल्हा प्रगतीपथावर आहे. ज्या जिल्ह्यात ३५ हजार रुपये दरडोई उत्पन्न होते तो जिल्हा सव्वा दोन लाख रुपये दरडोई उत्पन्नाचा झाला. त्यासाठी उत्पादित मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेत बाय प्रॉडक्ट आणले. पर्यटन जिल्हा घोषित करून देशभरातील आणि प्रदेशातील पर्यटन जिल्हा दानवे त्यामुळे विकासाला गती मिळाली. १९९० मध्ये शाळांमध्ये शिक्षक नव्हते. ४४२ शिक्षकांची एकाच वेळी भरती मी केली आज सिंधुदुर्गाला शिक्षकांच्या तुडवता नाही. हर सर्व श्रेय तुमचे आहे .कारण तुम्ही मला तुमचा आमदार म्हणून १९९० सली निवडून दिला म्हणून मी हे काम करू शकलो.
परिश्रम करायला पाहिजे पैसे मिळवून त्याचा योग्य वापर करायला पाहिजे. योग्य वापर योग्य गुंतवणूक केली तर आली आणि देशाची समाजाची प्रगती होऊ शकतो. कोकणात एखादा अंबानी, अदानी जन्माला आला तर समाधान वाटेल. एकदा उद्योजक आपल्या जिल्हातील व्हावा. देशाच्या श्रीमंतांमध्ये नाव व्हावे,अशी अपेक्षा केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.
राजकारण म्हणून नारायण राणे, नितेश राणे निलेश राणे यांच्यावर टीका केली जाते. आमच्यावर टीका का ? आम्ही येथे काही कमविण्यासाठी आलो नाही तर सिंधुदुर्ग वासियांना काहीतरी द्यायला आलो. आमची जन्मभूमी सिंधुदुर्ग, आमचे कर्तव्य आहे येथील जनतेला देणे लागतो ते काम करत राहणार. आमच्यावर आई – वडिलांची शिकवण, संस्कार आहेत. म्हणून समाजाला चांगले देत राहील पाहिजे समाज आपला आहे.
मुंबई ज्याच्या हक्काची आहे त्या मराठी माणूस उलाढाली मध्ये एक टक्का असणे मला असं वाटलं की आपला माणूस मराठी माणूस व्यवसाय का करू शकत नाही. त्याला मान मार्केटिंग करता यावी बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे. मालाची विक्री करावी. या सगळ्याचा सगळ्यांची माहिती ज्ञान मिळावं म्हणून उद्योगाची सवय लावण्यासाठी सिंधुदुर्गात आणि मुंबई शहर, कल्याण, डोंबिवली पासून ते वसई पुण्याला पर्यंत सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव सुरू केले. जे तरुण तरुणी कुटुंबिय काही असे वेगवेगळे खाद्यपदार्थ करून स्टॉलवर विकत ते आज मुंबई किंवा पुण्यामध्ये हॉटेलचे मालक झाले हे पाहून आणि ऐकून मला आनंद आनंद वाटतो,असा विश्वास ना.राणे यांनी व्यक्त केला.