रेड लाईट एरियातील मुलांच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल…….
शैक्षणिक पालकत्व स्वीकारा असे आव्हाहन करणारा, सामाजिक जाणीव जपणारा 29 डिसेंबर 2022 गोल्डन लेटर्स बाल विकास फाउंडेशन अंतर्गत पाटी पुस्तक या उपक्रमाच्या यशस्वी पूर्ततेचा कार्यक्रम काशिनाथ घाणेकर मिनी सभागृह ठाणे येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती ती डॉक्टर निशिगंधा वाड ह्यांची तसेच अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
रेड अलर्ट एरियामधील मुलांच्या शैक्षणिक,आरोग्य व सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेतलेल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर या गेली कित्येक वर्षे यांच्या बरोबर काम करत आहेत. आता त्यांच्या सोबत एक मोठी फळी जोडली गेली असून सगळ्यांचे काम कौतुकास्पद आहे.आणि त्यांच्या कार्याची छाप परदेशात देखील पोहोचली आहे.फाउंडेशनचे डॉक्टर दुष्यंत खेडीकर यांनी देखील मुलांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने योजना आखल्या आहेत.त्यावर काम सुरू आहे. डॉक्टर अमोल गीते यांचे या कार्यात पूर्ण सहकार्य लाभत आहे .
भांडुप येथील आयडियल स्कूल मध्ये या मुलांना शिक्षण दिले जाते .या कार्यक्रमाला खास ऑस्ट्रेलियाहून सर्जेराव पाटील, संध्या पाटील व त्यांचे कुटुंब आले होते या सगळ्या कार्यामध्ये या कुटुंबाचाही सिंहाचा वाटा आहे . तसेच आयडियल स्कूलच्या सेक्रेटरी मोना अरोरा मॅडम यांचेही मुलाच्या या उपक्रमाच्या यशस्वीतेमध्ये मोलाचे योगदान आहे.सचिव डॉ मनीषा गुरडे सदस्य शोभा ताई,उपाध्यक्ष श्री पराग पराग गराडे जनसंपर्क अधिकारी श्री विलास कुलकर्णी यांचा देखील मोलाचा सहभाग आहे.
आयुष्यामध्ये आपल्याला काय व्हायचं आहे हे नक्की ठरवा , आकाशातून पडलेल्या तीन थेंबांचे वर्णन करताना मुलांनी शिंपल्यातील अनमोल मोती कसे व्हावे हे डॉ. निशिगंधा वाड मॅडमने मुलांना पटवून दिले. जेव्हा तुम्ही सक्षम व आर्थिक स्वावलंबी व्हाल तेव्हा इतरांना मदत करायला विसरू नका असा प्रेमाचा संदेश गोल्डन लेटर्सच्या महत्त्वपूर्ण सल्लागार डॉ निशिगंधा वाड यांनी दिला.
कार्यक्रमात मुलांनी आपल्या नृत्यांनी सगळ्यांची मने जिंकून घेतली.
उपक्रम यशस्वी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार ह्या प्रसंगी करण्यात आला.
तिमिरातून तेजाकडे वाटचाल करणाऱ्या ह्या मुलांना उज्वल स्वप्न पाहण्याचे बळ देणाऱ्या सर्वांचे आभार.
ह्या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ.अश्विनी बापट ह्यांनी अगदी उत्तम प्रकारे केले.
या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारा असे सर्व उपस्थितांना डॉ गीते यांनी भाषणातून आवाहन केले .
संस्थेतर्फे लवकर विश्वविख्यात निसर्ग उपचार तज्ञ डॉ. चिदानंद फाळके सर आरोग्य शिबीर घेणार आहेत. संस्थेचे कार्य सौ. कल्पना गवरे यांच्या मार्फत यु .के मध्ये पोहचनार आहे अशी माहिती संस्थेचे जन संपर्क अधिकारी श्री. विलास कुलकर्णी यांनी दिली.
विलास कुलकर्णी
7506848664
जनसंपर्क अधिकारी
गोल्डन लेटर्स बाल विकास फाउंडेशन