*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण देशपांडे लिखित श्री.गोंदवलेकर महाराज काव्य – चरितावली*
काव्य-पुष्प- ६ वे
———————————-
श्रीमहाराजांची शाळा सुटली, शिकणे सुटले
“गणुबुवांचे मित्र”, ते मात्र नाहीच सुटले
पोरच ती, घालिती गावभर धिंग- धिंगाणे
पंतांकडे लोक येती मग करिती गाऱ्हाणे ।।
माझ्यामुळे कुळा कमीपणा येणे नाही
गणुबाळाने आजोबांना आश्वासन दिले
नातवाचे हे शब्द ऐकुनी पंतआजोबा
मनोमनी खुप सुखावले ।।
आईची आज्ञा श्रीमहाराज प्रमाण मानिती
गायी-वासरांना चारण्या जंगलात नेती
मधोमध श्रीमहाराज , गोड कथा सांगती
भोवती सवंगडी कथा ऐकण्यात रंगती ।।
काव्यचरित लेखनाने आनंद मना मिळतो
कवी अरुणदास श्रीगुरूचरणी रमतो ।।
———————————–
“अरुणदास”- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————-