You are currently viewing हाथरस घोटाळा: आणखीन एक नवीन खुलासा

हाथरस घोटाळा: आणखीन एक नवीन खुलासा

 

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर येतंय. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या हाती संबंधित आरोपीची एक मार्कशीटदेखील लागलीय. या मार्कशीटनुसार, आरोपीची जन्मतारीख २ डिसेंबर २००२ असल्याचं नमूद करण्यात आलंय. कुटुंबीयांकडून ही मार्कशीट सीबीआयच्या टीमकडे सोपवण्यात आलीय. 

 

हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर तपासाचा वेग वाढलाय. सीबीआयच्या वेगवेगळ्या चार टीम्सनं सोमवारी अनेक लोकांकडे घटनेबद्दल चौकशी केली. सीबीआयच्या एका टीमनं चंदपा पोलीस स्टेशनलाही भेट दिली. याच पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा प्रकरणाची एफआयआर दाखल करण्यात आली होती. सीबीआयच्या टीमनं या पोलीस स्टेशनचे तीन निलंबित पोलीस कर्मचारी सागाबाद सीओ राम शब्द, एसएचओ दिनेश कुमार वर्मा आणि मोहर्रिर महेश पाल यांची काही तास चौकशी केली.

 

तसेच सीबीआयच्या एका टीमनं दोन स्थानिक पत्रकारांचीकडेही प्रकरणाची चौकशी केली. १४ सप्टेंबर रोजी पीडितेची आई आणि भाऊ तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले असताना हे दोन पत्रकारही त्यांच्यासोबत होते. त्या माहितीनुसार, पीडितेला पोलीस स्टेशनमधून जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरकडेही सीबीआयनं चौकशी केली. यापूर्वी सीबीआयच्या तीन सदस्यीय टीमनं अलीगढच्या जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेजचा दौरा केला. पीडित मुलीला दिल्लीला हलवण्यापूर्वी तिच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा