You are currently viewing आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी  जिल्ह्यातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करा – डॉ. जयकृष्ण फड

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी  जिल्ह्यातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करा – डॉ. जयकृष्ण फड

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी  जिल्ह्यातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करा – डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी

राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत ‘आपदा मित्र’ हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून या प्रशिक्षण कार्यक्रमातील 96 प्रशिक्षणार्थीयाच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण दि.19 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत पूर्ण झालेले असून दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षणासाठी 104 स्वयंसेवकांची नाव नोंदणी करण्याचे काम सुरु झालेले आहे. तरी अधिकाधिक युवक-युवती यांनी नाव नोंदणी करून आपत्ती प्रतिसादाच्या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे.

        ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस शासनाकडून आपत्ती प्रतिसादासाठी आवश्यक साहित्याचा संच आपदा मित्र गणवेश देण्यात येईल. तसेच सदर व्यक्तीचा शासनामार्फत विमा उतरविणेत येईल.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचेमार्फत प्रशिक्षणार्थी यांची नोंदणीसाठी https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLScnt३q७mQZeejuvZL३qJZyKQWktRZkvQ३VCQGbR७Y५KazROHQ/viewform?usp=sf_link ही लिंक आहे.

            नोंदणी प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले पुढील निकष पूर्ण करणाऱ्यां व्‍यक्तींनी आपली नाव नोंदणी करावी. आपदा मित्र प्रशिक्षणात सहभागी होणारी व्यक्ती वय वर्ष 18 ते 40 दरम्यान असावी, माजी सैनिक, निवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंता यांचेसाठी वयोमर्यादा शिथिल केली जाईल. या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणारी व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची रहिवासी असावी.सदरची व्यक्ती किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. शारीरिक, मानसिक व भावनिक दृष्ट्या सदर व्यक्ती सुद्दढ असावी.(वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे आहे.) आपत्ती प्रतिसादाचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य.प्रत्येक सहभागी व्यक्तीकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी वरिल लिंक वर नाव नोंदणी करावी.

0000

प्रतिक्रिया व्यक्त करा