कुडाळ :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील तंजावर राज्याचे महाराज बाबाजी राजे यांची भेट, प्रचंड व्यक्तिमत्व परंतु अत्यंत विनम्र, हाच आहे छत्रपती घराण्याचा संस्कार आणि विचार.
पिंगुळी कुडाळ येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरी ला राजे यांनी भेट दिली व आपल्या तंजावर मद्ये पण मराठी लोक आहेत व आम्ही घरी शुद्ध मराठी बोलतो असे सांगत आपल्या तंजोर आणि महाराष्ट्र चा इतिहास सांगितला.
पद्मश्री गंगावणे यांचा कामाचे कौतुक केले व पद्मश्री आपल्याला शोधत आला अशी भावना व्यक्त केली. गंगावणे कुटुंबच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजी राजे यांनी तमिळनाडूमध्ये राज्यात तंजावर राज्याची स्थापना केली.