मालवण
खड्डेमय बनलेल्या मालवण शहरातील देऊळवाडा ते कोळंब सागरी महामार्गाच्या नूतनिकरणाच्या कामाला मंगळवार पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागत असल्याबद्दल किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मालवण शहरातील देऊळवाडा ते कोळंब सागरी महामार्गा वरील रस्ता बऱ्याच कालावधी पासून खड्डेमय बनला आहे. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणी भाजपा सत्तेत येताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सागरी महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला मान्यता दिली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून हे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवार पासून या कामाला सुरुवात करण्यात आली. भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी या कामाची पाहणी करून हे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी ठेकेदाराला सूचना केल्या. यावेळी गणेश परब, पिटर फर्नांडिस, विक्रांत बिर्जे, देवल हडकर, बाबू शिंदे, प्रसाद राऊत, दिपक पाटील आदी उपस्थित होते. हे काम मार्गी लागल्या बद्दल वाहन चालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.