You are currently viewing डेगवे श्री स्थापेश्वर मंदिराच्या भक्त निवासाचे उद्घघाटन संपन्न..!

डेगवे श्री स्थापेश्वर मंदिराच्या भक्त निवासाचे उद्घघाटन संपन्न..!

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या श्री स्थापेश्वर मंदिराच्या परीसरात सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ला मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री मा.ना.दिपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नातून व ‘क” वर्ग पर्यटन मधून २० लाखांचा निधी मंजूर केला होता.त्यामुळे सदर भक्त निवासाचे बांधकाम पुर्ण केले असून त्याचे उद्घाटन सोमवार दि.२जानेवारी२०२३रोजी डेगवे गावच्या सरपंच सौ.वैदेही देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.

श्री स्थापेश्वर मंदिर हे ४८ खेड्यांचे असल्याने या गावातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.त्यामुळे त्यांची सोय निश्चित झाली आहे.
या परिसरात खासदार विनायक राऊत साहेब यांच्या प्रयत्नातून १० लाखाचा निधी सार्वजनिक विहीरी करीता मंजूर झाला होतात्यामुळे त्याचे सुध्दा बांधकाम पुर्ण झाले आहे. याचे हि उदघाटन सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या वेळी ग्रामपंचायतीचे सर्व आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, देवस्थान समितीचे कार्यकारी मंडळ,पोलिस पाटील, माजी सरपंच मंगलदास देसाई,सोसायटीचे माजी चेअरमन सुनील देसाई, विवेक केसरकर,डेगवे ग्रामस्थ आर्वजून उपस्थित होते.

मंगलदास देसाई
माजी सरपंच,डेगवे.

प्रतिक्रिया व्यक्त करा