You are currently viewing अजित पवार, जितेंद्र आव्हाड ते वक्तव्य मागे घ्या

अजित पवार, जितेंद्र आव्हाड ते वक्तव्य मागे घ्या

राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांचा भाजपने प्रांताधिकारी कार्यालयासमोर केला निषेध

सावंतवाडी

येथील भाजपा सावंतवाडीच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजीत पवार व जितेंद्र आव्हाड यांचा प्रांत कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अजीत पवार व जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत ” छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ” असे केले अपमानास्पद वक्तव्य त्यांनी मागे घेऊन माफी मागावी , अशी मागणी केली.

यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, अजय गोंदावळे, मनोज नाईक,राजू बेग मोहिनी मडगावकर, उत्कर्षा सासोलकर समृद्धी विरनोडकर उदय नाईक, सुधिर आडीवरेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिपाली भालेकर, मिसबा शेख, केतन आजगावकर, प्रमोद गावडे, दिलीप भालेकर, संजू शिरोडकर, विराग मडकईकर, संतोष गोसावी, पंढरीनाथ राऊळ, सिदेश कांबळी, परिक्षेत मांजरेकर,अनिल सावंत,गुरुनाथ पेडणेकर, पिंटा सावंत, सुवर्णा गावडे , प्राजक्ता केळुसकर, साक्षी परब, सलमा शेख, मेघना साळगावकर,आरती माळकर, सूक्ष्मवी राऊळ, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा