*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावू माय*
कशाला ग सावू माय
केलास आमच्यासाठी रस्ता निर्माण शिक्षणाचा,
आणि दिलंस मिळवून आम्हाला स्वातंत्र्य.
या पेक्षा बरच होतं कि आम्हाला आमचं पारतंत्र्य.
ज्या देवाला आमची सावली ही नको असते त्याच देवाच्या,लांबून का होईना पण आम्ही पडतो पाया..
आम्हाला न स्वीकारणाऱ्या देवाला नाकारण्याचे धाडस मात्र करीत नाही आमची काया..
वाचताच नसत आल तर काय वाचलं असत ग आम्ही,पण
आता आम्ही वाचतो पोथ्या आणि धरतो निर्जल व्रत..
तू अंगावर झेललं शेण अन चिखल
करण्या निर्माण समाजात आमची पत
वेडी होतीस ग तू,
म्हणूनच स्वतःच्या संसाराकडे दिलं
नाहीस लक्ष
घेत होतीस नेहमी आमच्या
न्याय हक्कांसाठी
आमचा पक्ष
आजच्या युगातही नाही आम्ही
खरचं ग सुरक्षित..
तरी आम्ही मात्र आता होत नाहीत संघटित.
राजकारणही आमच्यासाठी
पुरुषांच्या तुलनेत नाहीच मुळी आरक्षित
आम्ही आता वाट पाहतो
दुसरी सावू व्हावी निर्माण
तिनेच करून द्यावे आम्हाला
आमच्या स्वत्वाचे योग्य भान
अन्यायाविरुध्द आमच्या डोळ्यात जेव्हा खरा अंगार दिसेल
तेव्हाच प्रत्येक स्रीत सावु तुझं रूप दिसेल
खऱ्या ज्ञानाचा प्रसार जेव्हा आमच्या मार्फत होईल
पुष्पांजली अशी तुझ्या चरणी सावू तेव्हा आपसूक रुजू होईल.
*सुजाता नवनाथ पुरी*
8421426337