बांदा
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेचा ३४ वा आंतरशालेय क्रीडामहोत्सव डॉ.व्ही.के.तोरसकर व डॉ.सौ.आशालता व्ही.तोरसकर पुरस्कृत क्रीडा स्पर्धा,शिक्षणमहर्षी श्री.प्रताप तथा आबासाहेब तोरसकर पुरस्कृत हॅण्डबॉल व कबड्डी स्पर्धा आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्मारक वक्तृत्व स्पर्धा,स्व.नारायण आत्माराम सावंत हिंदी वक्तृत्व सप्रधा व स्व.लक्ष्मण राघोबा तोरसकर पुरस्कृत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा उद्या ३ व बुधवार ४ जानेवारी रोजी होणार आहे.
या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन मंगळवारी सकाळी १० वाजता शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांच्याहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.मिलिंद तोरसकर हे असून या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत,माजी सभापती सावी लोके,शर्वणी गावकर,माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.श्वेता कोरगावकर,बांदा सरपंच प्रियांका नाईक,माजी सरपंच अक्रम खान प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर बुधवार ४ जानेवारीला संस्थेच्या सचिव श्रीमती कल्पना तोरसकर यांच्याहस्ते वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.सायंकाळी ३ वाजता पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे,उपनिरीक्षक समीर भोसले, माजी सरपंच अक्रम खान उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सीमाताई तोरसकर,सचिव कल्पना तोरसकर, कोषाध्यक्ष वैभव नाईक,प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर,सहसचिव नंदकुमार नाईक,मुख्याध्यापक एम्.एम्.सावंत यांनी केलं आहे.