You are currently viewing थकीत कर्ज एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत-  प्रिती पटेल

थकीत कर्ज एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत-  प्रिती पटेल

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ) यांचेमार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या मुदती कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज, मार्जिन मनी कर्ज सर्व योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येत, असल्याची माहिती  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली.

           संबंधित कर्ज खातेधारकांनी  या योजना  मर्यादीत कालावधीकरिता असून या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे. लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्या रुपये 10 लक्ष कर्ज परतावा योजनेतंर्गत तसेच विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग  02362 228119/866889950 या दूरध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा