You are currently viewing म्हापण व कुशेवाडा गावातील भाजप शिष्टमंडळाने वेंगुर्ले दूरसंचार कनिष्ठ अभियंता सौ. कामत यांची घेतली भेट

म्हापण व कुशेवाडा गावातील भाजप शिष्टमंडळाने वेंगुर्ले दूरसंचार कनिष्ठ अभियंता सौ. कामत यांची घेतली भेट

वेंगुर्ला :

म्हापण दुरध्वनी केंद्रातील बॅट-या निकामी झाल्याने लाईट गेल्यावर मोबाईल सेवा पुर्णतः खडीत होते तसेच म्हापण दुरध्वनी केंद्रासाठी देण्यात आलेला जनरेटर नादुरुस्त आहे तो चालु करण्यासाठी सांगुन सुध्दा दुरूस्त करत नाही. दुरध्वनी केंद्रातील एसी बंद आहेत. या सर्व समस्या दुर न झाल्यास 26 जानेवारी ला उपोषणास बसणार अशा इशारा म्हापण ग्रामपंचायत सदस्य श्री. गुरूनाथ मडवळ यांनी दिला.

तसेच कुशेवाडा येथे बीएसएनएल टाॅवर व्हावा यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत आपण करु असे कुशेवाडा सरपंच श्री. निलेश सामंत यांनी सांगितले.

यावेळी श्री. गुरूनाथ मडवळ म्हापण ग्रामपंचायत सदस्य, श्री. महादेव सापळे उपसरपंच कुशेवाडा, श्री. विजय ठाकुर, श्री. संजोग परब, श्री. विनीत कीनळेकर, श्री. प्रदीप गवंडे, कुशेवाडा ग्रामपंचायत सदस्य श्री. सिध्देश माडये, श्री. विठोबा राणे, श्री. गणपत माधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा