*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”*
नववर्षाचे करू स्वागत जल्लोषात
बोलता पहातां वर्ष संपले आशेंत।।ध्रु।।
जन्म-मृत्यू अटळ चक्र राहे चालत
काळ पुढे जाई कुणासाठी न थांबत
सूर्यास्तानंतर सूर्योदय होई निश्चित।।1।।
कुणाचे कार्यारंभ कुणाचा शेवट
करावे प्रयत्न सकारात्मक रहावेत
काळ ठरवील कोण श्रेष्ठ नी कनिष्ठ।।2।।
सुख-दुःखाच्या आठवणी उजळाव्यात
दुःख विसरावे आनंदी क्षण वेचावेत
प्रेम मैत्री संबंध सर्वांशी वाढवावेत।।3।।
सुविध शोध तंत्रज्ञान स्विकारावेत
जीवनाच्या पथावर चालावे सुरळीत
समृद्ध सुखी जीवनाचा लुटावा आनंद।।4।।
मागे वळुन पहाता दोष टाळावेत
प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावेत
रात्र सरेल येई उद्याची शुभ पहाट।।5।।
करावा नित्य व्यायाम आहार संयमित
संपदा टीकेल पर्यावरण जपावेत
सांभाळावी रोजनिशी संयोजनाची रीत।।6।।
श्री अरुण गांगल. कर्जत,रायगड.महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.