*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, ज्येष्ठ लेखक भावकवी वि. ग.सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चिरंतन कालचक्र*
*****************
येती जाती सरती क्षणक्षण
चिरंतन हे कालचक्र निरंतर
अनादीअनंत तो भगवंत
ब्रह्मांडाचा एक तारणहार
रोज फुटे अंकुर पालवीचा
नित्य नवाची साक्षात्कार
कोवळे मन जणु फुल सुंदर
चैतन्याचे रूप कृष्णमनोहर
भगवंतरूप चिदानंद स्वरूपं
लाघवी रामकृष्ण वरदहस्तं
परमसुखदा नीजानंद स्वरूपं
रामनाम सत्यंशिवंसुंदरशरणं
***********************
*रचना क्र. ३६३ / ३१ /१२ /२०२२*
*©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞( 9766544908 )*