मुंबई / भांडुप :
मुंबई – खरं तर लग्न तडजोड एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच मुलामुलींची लग्ने जमणे अवघड झाले आहे. दोघांचे विचार पटावे, नातेसंबंधात दरी निर्माण होणे अशा समस्या सातत्याने उद्भवत असल्याने त्यातच पालकांचा हस्तक्षेप जबाबदारीची जाणीव यासाठी प्रथमच मराठा क्षत्रिय विदयावर्धक मंडळ मुंबई आणि कार्यरत सर्व वधूवर मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दि.७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० ते ५.३० वाजेपर्यंत (मक्षवि) सभागृह छत्रपती शिवाजी तलाव, टेबीपाडा रोड, भांडुप (प) मुंबई येथे गाबीत समाजाचा वधू वर (परिचय) संयुक्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी त्याकरिता नोंदणी प्रक्रियेसाठी गटप्रवर्तकाकडे आगाऊ रक्कम जमा करून अथवा गुगल अर्ज भरून माहिती पाठविणे.
आपला प्रवेश नक्की करायचा असल्यास सर्वश्री प्रदिप सारंग ९८९२८३१४९१ , हरिश्चंद्र वस्त ९६१९३६७१६०, ९८६९२८९८०२ , रविंद्र भाबल ९८७००११२२०, सौ.रसिका बांदकर ९९६७३५०९२१, ८८२८२८१२१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. यावेळी सकाळी (मक्षवि) सभागृहात ९.३० ते १०.३० पर्यंत अर्ज भरून देऊ शकता असे सूचित करण्यात आले आहे. यासंदर्भात विशेष सूचना नमूद करण्यात आलेली आहे की, आगाऊ पैसे भरून नावनोंदणी केलेले वधू वर जर मेळाव्यास उपस्थित राहू शकले नाहीत तर त्यांचे भरलेले पैसे मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी होऊया मग चला तर भांडुपच्या आपल्या मेळाव्याला!