You are currently viewing बारा खेळाडूंचा चालतो जगावेगळा खेळ,

बारा खेळाडूंचा चालतो जगावेगळा खेळ,

*मराठी बालभारती थीम साँग शॉर्ट फिल्म आदींसाठी विविधांगी लेखन करणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यातील लेखिका कवयित्री सौ.सुनंदा भावसार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

बारा खेळाडूंचा चालतो जगावेगळा खेळ,
थांबत नाही कुणीच, जातो वर्षभराचा वेळ…

एका मागे एक येतात हातात हात धरून,
गोल गोल फिरतात एक रिंगण करून…

जानेवारीच्या हातात फेब्रुवारीचा हात,
मार्चवर करतो रागिट एप्रिल मात…

मे च्या मागे सपाटून पळत जातो जून,
जुलै सुद्धा धावत जातो ऑगस्ट आला म्हणून…

सप्टेंबर -ऑक्टोबर लबाड मात्र फार,
‘थंडी किती वाजते’ म्हणत हळूहळू जाणार…

नोव्हेंबर डिसेंबर यांचा नंबर शेवटी,
ते गेलेत की परत पहिल्यांचीच एन्ट्री…

वर्षभर चालते यांची स्पर्धा अशी पळण्याची,
थकत नाही कुणीच त्यांना मजा वाटते पळण्याची…

बक-अप् म्हणत एकमेकांना करतात पुन्हा चिअर,
जुने वर्ष गेले की *हॅपी न्यू इयर- हॅपी न्यू इयर*…

©®सौ. सुनंदा सुहास भावसार,
नंदुरबार.
(९०९६३४९२४१)

प्रतिक्रिया व्यक्त करा