बाजारपेठ मित्रमंडळ च्या देवीसमोर नारळ फोडल्याची सावंतवाडीत चर्चा.
देवीसमोर नारळ फोडण्याची प्रथा नसल्याचे मित्रमंडळाकडून स्पष्ट..
सावंतवाडीत कालपासून देवीसमोर नारळ फोडल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. एका भक्ताला राजकीय नेत्याने आर्थिक बाबीमध्ये अडचणीत आणल्याने समोर कोणताही मार्ग दिसत नसल्याने त्या भक्ताने आपले गार्हाणे देवीसमोर मांडत नारळ फोडल्याची चर्चा होत होती. बाजारपेठेत प्रत्येकजण आपापल्या परीने रंगवून चर्चा करत असताना सदरची चर्चा संवाद मिडियापर्यंत येऊन पोचली. संवाद मीडियाने देखील लोकांमध्ये होत असलेली चर्चा सर्वांसमोर मांडली होती.
संवाद मीडियाने मंडळातील जबाबदार व्यक्तीकडे याबाबत विचारणा केली असता, *बाजारपेठ मित्रमंडळाच्या देवीसमोर ओट्या भरल्या जातात, नारळ अर्पण केले जातात परंतु नारळ फोडला जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.* नारळ फोडण्याची प्रथा नसून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे कोणतेही प्रकार केले जात नसल्याचे सांगितले.
आपण अडचणीत आल्याने त्या भक्ताने आपल्याला आर्थिक संकटात टाकून फसवणाऱ्या त्या नेत्या विरोधात भक्ताने देवीला नारळ अर्पण केला असेल परंतु सावंतवाडीत सुरू असलेल्या चर्चेत पराचा कावळा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देवीसमोर नारळ फोडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.