*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*साल नवे!*
साल येते साल जाते काय त्याचे?
यूग आहे आज हल्ली धावत्याचे!
थांबला तो संपला हे सत्य आहे!
ऐक मित्रा बोल थोडे जाणत्याचे!
भाव तेथे देव आहे ठेव श्रद्धा,
शेत राखी सावळाही सावत्याचे!
विठ्ठलाचा ध्यास ऐसा लागला मज,
मस्तकाला रोज लागो पाय त्याचे!
काय जगला त्याहुनी जगला कसा ते,
मोल त्याला फक्त ठेवा भान त्याचे!
जयराम धोंगडे
नांदेड