वेताळ प्रतिष्ठान आयोजित खुल्या रस्सीखेच स्पर्धेला प्रतिसाद
वेंगुर्ले
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित आयोजित खुल्या रस्सीखेच स्पर्धेत अतिशय रोमहर्षक चुरशीच्या अंतिम सामन्यात सिद्धेश्वर दाळकर संघ,तळवडे यांनी स्टार किंग निरवडे संघास पराभूत करत विजेतेपद पटकाविले,तर स्टार किंग निरवडे संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.शालेय गटात श्री जनता विद्यालय तळवडे ला नमवत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ने बाजी मारत विजेत्या पदाचे मानकरी ठरले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने श्री जैतीर मंदिर तुळस येथील मैदानावर आयोजित शालेय व खुल्या पुरुष रस्सीखेच स्पर्धेचे उदघाटन तुळस सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई परब, संतोष परब ,निलेश नागवेकर, पोलीस उप निरीक्षक रंजीता चौहान, तुळस उपसरपंच सचिन नाईक, ग्रा.प.सदस्य जयवंत तुळसकर आणि नारायण कुंभार,जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव व राष्ट्रीय रस्सीखेचपटू किशोर सोनसुरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर व नाना राऊळ, प्रकाश परब, सुजाता पडवळ, मधुकर परब, सुधीर चुडजी, महेश राऊळ , मंगेश सावंत, सद्गुरु सावंत,प्रसाद भणगे,हेमंत गावडे आदी मान्यवर उपस्थित हॊते.
शालेय स्पर्धेच्या उदघाटन वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक रंजीता चौहान यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यांनी क्रीडा क्षेत्रात ग्रामीण युवकांना प्रोत्साहान देण्याचा वेताळ प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत कौतुक केले व अशा क्रीडा स्पर्धातून भविष्यातील खेळाडू घडत असल्याने सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे असे आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा परब यांनी खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून शालेय मुलांना मोबाईल पासून बाजूला ठेवण्यासाठी प्रतिष्ठान राबवित असलेल्या अनेक उपक्रमांना मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा असे प्रतिपादन केले.यावेळी संपन्न झालेल्या या जिल्हास्तरीय शालेय व खुल्या गटातील रस्सीखेच स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला. यावेळी सिद्धेश्वर डाळकर, तळवडे , स्टार किंगनिरवडे यांनी अनुक्रमे विजेता व उपविजेता मान मिळविला तर बेस्ट फ्रंटमन सतीश नाईक ( स्टार निरवडे ) आणि बेस्ट लास्टमन दादा परब (सिद्धेश्वर दाळकर ) यांनी बहुमान मिळविला.
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.स्पर्धा यशस्वीतेसाठी समिजिक कार्यकर्ते विकास शांताराम घारे आणि माजी मुंबई महानगरपालिका नगरसेवक सगुण (दादा) नाईक यांचे विशेष सहकार्य लाभलं.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रज्वल परुळकर, यशवंत राऊळ, बंड्या राऊळ, हेमलता राऊळ,माधव तुळसकर, प्रांजलसावंत, अक्षता गावडे, ओमकार राऊळ, हर्षवर्धन ताबोसकर, प्रमोद ताबोसकर, सानिया वराडकर,मिलन नाईक, सागर सावंत,केशव सावंत, विनायक सावंत,निखिल ढोले,सूरज तुळसकर, बंटी सावंत,गणेश सावंत,जान्हवी सावंत,विधी नाईक,किशोर नाईक,प्रतीक परुळकर, गौरेश आरमारकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर यांनी तर आभार सचिन गावडे यांनी मानले.