वेंगुर्ला
आपण ज्या समाजात राहातो,वाढतो त्या समाजासाठी आपण नेहमीच ऋणी राहिले पाहिजे आणि आपल्या ज्ञानचा कौशल्याचा आणि क्षमताचा वापर समाजहिता साठी केला पाहिजे असे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधताना त्यांनी आपले विचार मांडले. बँ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचा सांगता समारंभ नुकताच वेंगुर्ले परबवाडी येथे पार पडला त्यावेळी समारोपीय व्याख्याना साठी युवा वक्ता म्हणुन सुप्रसिद्ध असणारे प्रा.वैभव खानोलकर यांना विशेष मार्गदर्शक म्हणुन या सांगता समारंभाला आमंत्रीत करण्यात आले होते. “ग्रामीण समाज आणि युवकाची भुमिका” या विषयावर मंथन करताना
या आजची युवा पिढी ज्या प्रकारे भरकटते त्यावर सुध्दा भाष्य करताना तुम्हीच आहात तुमच्या जिवनाचे शिल्पकार यांची जाणिव शिबिरात सहभागी महाविद्यालयलीन विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिली ग्रामीण भागातील विविध समस्याचा आढावा घेताना अधंश्रध्दा, अज्ञान, अप्रगत शेती, वाढणाऱ्या व्यसनाचे प्रमाण घटस्फोटाचे वाढते प्रमाण, लव्हजिहाद,प्रेमाबद्दल चे आकर्षक,प्रेमभंगातुन वाया जाणारी तरुणाई,मोबाईल वेड,आत्मविश्वासाचा असणारा आभाव याच बरोबर मुलीची लग्न संस्कृती कडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन आदी भौतिक सुखासाठी आणि कमी कामात जास्त दाम मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाने मिळणारा पैसा त्यातुन उध्वस्त होणारी तरुणाई, राजकीय लोकांकरावी युवाईचा होणारी गळचेपी, बेकारी आणि पुढारी लोकांचे हस्तक बनलेले तरुण कार्यकर्ते आणि विविध मुद्दे त्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण मांडणीतुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थितीची जाणीव करुन दिली. या सांगता समारोह प्रसंगी व्यासपीठावर प्रा.वामन गावडे,डाँ.बांदेकर सर आणि आदी प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
प्रा.खानोलकर हे खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असुन ते दशावतार युवा अभ्यासक ,सुप्रसिद्ध निवेदक,युवा व्याख्याते आणि उपक्रमशील अध्यापक म्हणुन परिचित असुन सध्या ते नेमळे उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे,सावंतवाडी आणि न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले ठिकाणी कार्यरत आहे.