You are currently viewing रजिस्ट्रेशनमध्ये फसवणूक झालेल्या त्या वाहन धारकांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून अन्याय

रजिस्ट्रेशनमध्ये फसवणूक झालेल्या त्या वाहन धारकांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून अन्याय

त्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाईंचे अधिवेशनात उत्तर

आ. वैभव नाईक यांनी आवाज उठविल्याने दंड भरून गाड्या नियमित करण्यावर मंत्री सकारात्मक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदेशीर रजिस्ट्रेशन झालेल्या ११६ वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतच्या नोटीसा परिवहन विभागाने दिल्या असल्याचे उत्तर मंत्री शंभूराज देसाईं यांनी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे. या गैरव्यवहारात वाहन धारकांचा दोष नसतानाही हे वाहन धारक नुकसानात गेले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून या वाहन धारकांना दिलासा देण्याऐवजी वाहनांचे बेकायदेशीर झालेले रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र यामुळे वाहन धारकांवर अन्याय झाल्याने किमान त्या वाहनांचे पुन्हा पैसे भरून रजिस्ट्रेशन करावे अशी विनंती आ.वैभव नाईक यांनी करत संबंधीत मंत्र्यांशी चर्चा केली.याप्रश्नी त्यांनी आवाज उठविल्याने दंड भरून गाड्या नियमित करण्यावर मंत्री महोदयांनी सकरात्मकता दर्शविली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत २०१७ ते २०२२ या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता एकूण ११६ वाहनांची अनियमित बेकायदेशीर नोंदणी झाली. यातील काही वाहनांची विमा नोंदणी रजिस्ट्रेशन ते आरसी बुक मिळेपर्यंतची प्रक्रिया हि गैरमार्गाने व बेकायदेशीररित्या झाल्याने त्या वाहनधारकांवर अन्याय झाला.मात्र या गैरव्यवहारात वाहन धारकांचा दोष नसतानाही सदर वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द होणार असल्याचे माहिती मिळाल्याने आ.वैभव नाईक यांनी याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला.
फसवणूक झालेले ते वाहनधारक सर्वसामान्य कुटूंबातील आहेत त्या वाहनांची किंमत २० कोटी रु पर्यंत आहे. मात्र विनाकारण हे वाहन धारक नुकसानात गेले.याबाबत आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले.त्या वाहनांचे पुन्हा पैसे भरून रजिस्ट्रेशन करावे अशी विनंती देखील केली. मात्र या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उपस्थित असलेले मंत्री शंभूराज देसाईंनी वाहन रजिस्ट्रेशन मध्ये गैरव्यवहार करणाऱ्या खाजगी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आणि परिवहन कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून त्यांना निलंबित करून अकार्यकारी पदावर पुन्हा सेवेत घेतल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर बेकायदेशीर रजिस्ट्रेशन फी चा पैसा सरकारी तोजोरीत जमा झालेला नाही.खाजगी व्यक्तींकडून त्यात अपहार झाला त्यामुळे बेकायदेशीर रजिस्ट्रेशन झालेल्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतच्या नोटीसा परिवहन विभागाने दिल्या आहेत. असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे. त्यामुळे या वाहन धारकांवर सरकारकडून अन्याय केला जात असल्यामुळे आ.वैभव नाईक यांनी त्यावर आवाज उठविला व संबंधीत मंत्र्यांशी चर्चा केली.त्यावर दंड भरून गाड्या नियमित करण्यावर मंत्री महोदयांनी सकरात्मकता दर्शविली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा