You are currently viewing गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांना अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार

गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांना अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

बदलापूर :

 

बदलापूर (जि.ठाणे) येथील प्रसिद्ध गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी,मुंबई या संस्थेच्या वतीने “अक्षरमंच काव्य समुहात” घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत त्यांनी सलग दोन वर्ष उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल व त्यांच्या साहित्यसंपन्न जीवनाची उल्लेखनीय यशस्वी वाटचाल, समाजाभिमुख गुणवत्तेच्या सन्मानार्थ “अष्टपैलू काव्यभूषण-राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

सदर सोहळा आळंदी येथे दि.२५/१२/२२ रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जागतिक किर्तीचे साहित्यिक डाॅ.मधुसुदन घाणेकर(पुणे) व संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.श्री शिवाजी खैरे सर होते. त्यांच्याच हस्ते हा सन्मान करण्यात आला.

श्री यशवंत पगारे यांच्या “ह्रदयातील सुगंधी जखमा” ह्या गझल संग्रहास नुकतेच दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. पाठोपाठ हे पुरस्कार मिळून त्यांचा सन्मान होत आहे म्हणून त्यांचे सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊन कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा