सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचा सुद्धा सन्मान;ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलच्यावतीने झाले वितरण
सावंतवाडी
ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि दैनिक लोकमत चे उपसंपादक अनंत जाधव यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार सचिन परब म्हणाले, पत्रकारांनी जनतेचे नेतृत्व करावे तसेच रक्ता अभावी रुग्णांचे प्राण जाऊ नये म्हणून सिंधू रक्तमित्र संघटना घेत असलेली काळजी समाजासाठी प्रेरणादायी आहे.
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि दैनिक लोकमत चे उपसंपादक अनंत जाधव यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने जेष्ठ पत्रकार जतिन देसाई, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ संभाजी खराट, सचिन परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी ऐजेएफसीचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, सरचिटणीस बाळकृष्ण कासार, प्रदेश अध्यक्षा कांचन जांबोटी,जी. बी. राजपूत, निलेश पोटे, दिनकर पतंगे, अभिमन्यू लोंढे, निसार सय्यद, सत्यवान विचारे, गणेश गोडसे तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर,सल्लागार उद्धव गोरे , सावंतवाडी सचिव बाबली गंवडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, कुडाळ वेंगुर्ले संघटक यशवंत गावडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अरुण गवस, नंदन घाटे, कणकवली कार्यकारिणी सदस्य श्रध्दा पाटकर आणि राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी सफल विकास वेल्फेअर सोसायटी मुंबई, पत्रकार सत्यवान विचारे, बाळासाहेब गणोरकर, रवींद्र बेडकिहाळ, सचिन ठोंबरे, ईश्वर हुलवान,अमजद नदाफ,सागर सुरवसे,किरण सेंदाणी, दत्तात्रय उकिरडे,अक्षय मस्के, दिनकर पतंगे आदींना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ संभाजी खराट म्हणाले, तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी काम करत त्यांच्या प्रश्नांची मांडणी पत्रकारांनी केली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांमुळे प्रिंट मीडियात घटनेची, प्रश्नांची वाचकांना आवडलेल अशी माहिती दिली पाहिजे.
जेष्ठ पत्रकार सचिन परब म्हणाले, पत्रकारांची विश्वासहार्ता संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबरोबरच न्यायदेवता, निवडणूक आयोग, बॅका,एल आय सी अशा लोकशाही स्तंभ व संस्थाची विश्वासहार्ता संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकारांनी आपली माणसं सांभाळत त्यांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांना स्थान देत संघर्ष करत त्यांना उभे करण्यासाठी पुढाकार घेतला तर पत्रकारांना समाज पाठिंबा देईल
जेष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी जगभरात पत्रकारांवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा आढावा घेतला ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर महिला संपादक होत्या पण आज महिलांना स्थान नाही. तसेच बहुजन समाजातील व्यक्ती माध्यमात उच्च पदावर नेमणूक केली जात नाही. बातमी मांडणी करताना कोणाला आवडेल किंवा नाही ही भिडभाड पाहता कामा नये. माध्यमात सेन्सॉर शीप आल्याने युट्यूब, सोशल मीडिया वाढत आहे. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना स्थान दिले पाहिजे.
ऐजेएफसी चे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, रवींद्र बेडकिहाळ, बाळकृष्ण कासार, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, निसार सय्यद,व मान्यवरांनी विचार मांडले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन यासीन पटेल यांनी तर स्वागत गणेश कोळी आदींनी केले.