राष्ट्रीय ग्राहक दिन’ जामसंडे येथे उद्या
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या बुधवार दि.28 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम देवगड तालुक्यातील जामसंडे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तहसिलदार स्वाती देसाई यांनी दिली.