रस्ता सोडून २० फूट खाली कोसळली कार.
मालवण
नागपूर येथून मालवण येथे आलेले पर्यटक मालवणहून गोव्याला जात असताना धामापूर येथील तीव्र वळणांच्या उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांच्या ताब्यातील MH – 02 EZ – 1308 ही रनॉल्ट क्वीड कार रस्त्याच्या बाहेर जात सुमारे २० फूट खोल खाली कोसळली.
सुदैवाने या परिसरात झाडे आणि वेली असल्याने कार जोरात आदळली नाही त्यामुळे आतील तीनही पर्यटकांना फक्त किरकोळ दुखापत झाली पण झाडाला आदळून कारचे मात्र नुकसान झाले आहे. दरम्यान वाहतूक पोलिस दिपक तारी , शैलेश सोन्सुरकर यांनी अपघातस्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच विनोद सांडव , बाबू तोरसकर , सिद्धेश परब आणि स्थानिक तरुणांनी मदतकार्य केले.