You are currently viewing आयुष्याच्या पानावर

आयुष्याच्या पानावर

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर, गोवा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आयुष्याच्या पानावर*

आयुष्याच्या पानावर
रेखाटलेली चित्रं शैशावतली
हळू हळू पुसत चाललेली…..
स्वप्न ऊरीची फुललेली
दिवसेंदिवस, मास, संवत्सर
एकामागून एक उलटलेली…..
काळपटावरची रांगोळी
होत होती विस्कळत……
आघात अपघातांच्या ओरखड्यानी
जखामांवरील घाव घायाळ होउन
रक्तबंबाळीत….. वाहणारे
खपली भरून येते न तोच
परत परत आदळणाऱ्या आपदलाटा
उध्वस्त करून टाकणाऱ्या……
पुन्हा त्या वठलेल्या
आयुष्याच्या पानावर……
पानगळीतून नवचैतन्य पल्लवी
उगवेल ह्या आशेने…..,
उमेदीने पाऊलवाट रेटत
चाललेली…. थकलेली पावलं
जरावस्थेतील काया दमून,
विसावा घेते आयुष्याच्या
पल्याड किनाऱ्यावर……
नि, दूरवरून येतो
आशा आकांक्षांचा प्रकाश झोत
न्हाऊन निघत मग,
तन अन् मन……….!
आयुष्याच्या पानावरच्या
पल्लवलेल्या, गाभुळलेल्या
नव चैतन्यातल्या शिरा … रेघा
टवटवीत होऊन….
रहात आहेत बघत….
जोषातल्या पावलांच्या
गतीवर………!!

मानसी जामसंडेकर
गोवा

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा