You are currently viewing राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या जादा वेतवाढी रोखता येणार नाहीत – आमदार नागोजी गाणार

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या जादा वेतवाढी रोखता येणार नाहीत – आमदार नागोजी गाणार

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय व व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मेळावा दिनांक २५/१२/२०२२रोजी ज्ञानविकास विदयाल नागपुर येथे संपन्न झाला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर हे होते तर मेळाव्याचे उद्घाटन शिक्षक आमदार नागोजी गाणार यांनी केले.या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्य शाखेचे पदाधिकारी माधव वायचाळ,सुनिल गुरव ,दिलीप केने, प्राजक्ता रणदिवे,नेतरामजी बिजेवार आदि उपस्थित होते.
मेळाव्याचे उद्घाटन सरस्वती प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन शिक्षक आमदार नागोजी गाणार व राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आलीज्ञ.सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ. पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.मेळाव्याचे प्रास्ताविकात विभागीय अध्यक्ष यांनी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे ध्येय धोरण आणि संघटनेची वाटचाल व मेळाव्याचा उद्देश सांगितला .राज्य प्रवक्ता सुनिल गुरव व राज्य सहचिटणीस यांनी संघटनेची आवश्यक का आहे? संघटनेच्या कार्याचे महत्त्व विषेद करून संघटनेसाठी सभासदांचे योगदान आवश्यक असल्याने संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे विविध प्रलंबित असलेले प्रश्न त्या प्रश्नांसाठी संघटनेने आतापर्यंत केले प्रयत्न या विषयी माहिती देऊन शासनाकडे या शिक्षकांच्या २०१४पासुन बंद असलेल्या जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करणे,कायम स्वरुपी ओळखपत्र देणे,जिल्हांतर्गत बदल्या मध्ये संवर्ग १मध्ये समाविष्ट करणे, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ज्यांच्या पदोन्नती मध्ये या शिक्षकांना प्राधान्य देऊन १०%जागा राखीव ठेवणे,रेल्वे व बस सवलत पास देणे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी जाहीर करून वितरीत करणे, न्यायालयाने जादा वेतनवाढी मंजुर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, विविध शासकीय समितीवर निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्ती करणे,शिक्षकांचे मासिक वेतनासाठी आर्थिक तरतुद नियमित वेळेवर जिल्हा परिषदेला पाठवणे, नोव्हेंबर 2022च्या वेतनासाठी आर्थिक तरतुद अपुरी पाठवण्यात आली आहे त्यासाठी लवकर निधी जिल्हास्तरावर पाठवणे ,जुनी पेन्शन योजना लागु करणे,राज्यातील शिक्षक , केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी,विषय शिक्षक यांच्या रिक्त जागा भरणे,2005पुर्वी नियुक शिक्षकांची अंशदायी पेन्शन योजना अंतर्गत कपात झालेली रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे यासह आदि प्रश्नांवर चर्चा करून चालु हिवाळी अधिवेशनात मांडून हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती आमदार महोदया निवेदन देऊन केली आहे.उद्घाटनपर भाषणात शिक्षक आमदार नागोजी गाणार यांनी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या जादा वेतनवाढी शासनाला बंद करता येत नाहीत .ह्या वेतनवाढी बंद करण्यात आल्याबद्दल निषेध व्यक्त करून ह्या वेतनवाढी सुरू करण्यासाठी चालु अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधणार तसेच आमदार महोदय व इतर पुरस्कार प्राप्तांना जसे शासकिय ओळखपत्र आहे तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षका ओळखपत्र देणे आवश्यक ओळखपत्र हा सन्मान आहे.ज्या वेतनवाढी दिल्या आहेत.त्यांची वसुली बंद करणे, पदोन्नती मध्ये प्राधान्य, विविध समितीवर नियुक्ती , दरवर्षी पुरस्कार वितरीत हे 5सप्टेंबरला करणे ,आदि प्रश्नांसाठी पाठपुरावा करून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन संघटना पदाधिकारी व उपस्थित शिक्षकांना दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हाध्यक्ष सुनिल नायक यांनी केले तर आभार प्रदर्शन शारदा रोशनखेडे यांनी केले.मेळावा यशस्वीतेसाठी विभागीय सरचिटणीस बळीराम चापले नुरहरी लांजेवार ,सचिन चव्हाण,मनोज रहांगडाले,पक्षभानढोक,चित्रा मजुमदार,शुभांगी पोहरे,किर्ती पालटकर ,मनीषा शहाकार,शुभ्रा राॅय ,माया गेडाम ,रंजना सोरमारे,सतिश पुंड , गोविंद ढाले,प्रशांत जांभुळकर संघपाल मेश्राम,क्रिष्णा गवळी , ओंकारनाथ दाणी ,देवेंद्र गाठे,मनिष शेटे ,यासह नागपुर विभागीय ,जिल्हा कार्यकारणी ,तसेच वर्धा ,गोंदिया , चंद्रपुर जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद यांनी परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी केला आहे.राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या मेळाव्याचे अतिशय उत्कृष्ट आयोजन करून मेळावा यशस्वीतेसाठी उत्तम प्रतिसाद शिक्षकांनी दिल्याबद्ल व संघटनेची अगदी कमी कालावधीमध्ये राज्यात बांधणी करून सर्व राज्यात संघटनेचा विस्तार केल्याबद्दल आमदार महोदय यांनी राज्याध्य राज्यकार्यकारणी सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांचे कौतुक केले आहे.राज्यात प्रथम मेळावा घेऊन नागपुर जिल्हा शाखेने घेतलेल्या परिश्रमाचे सर्व राज्य पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा