You are currently viewing आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आयुष्याच्या संध्याकाळी.*

काय करावे कळेना
आयुष्याच्या संधयाकाळी,
थकवा जाणवे खुप
सकाळी नी वेळोवेळी..।१।

उठा बसायला त्रास
जाणवतो असा काही,
आता जास्त जगण्यात
उरलेला राम नाही..।२।

कार्य सारे पार पडले
काळजी नाही कशाची,
करीत नसतो चिंता
अशाची किंवा तशाची..।३।

मुले बघती सगळे
संसार आपआपले,
त्यांचे करिता बापाने
पोट स्वतःचे कापले..।४।

पती पत्नी दोघे ही
आम्ही करतो देवदेव,
बांधीत बसतो बघा
पुण्याची ही सारी ठेव..।५।

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा