You are currently viewing काजळ

काजळ

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार आण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*

काजळ.

तुझ्या डोळ्याचे काजळ
माझ्या काळजाची हाक
साजणी गं तु पाऊल
पुढे आरामात टाक

काजळ हे डोळ्यातील
मला इशारा करते
तुझ्या डोळ्यातील प्रेम
सखे गालात तरते

जीव कासाविस झाला
अश्रु डोळ्यात पाहून
गलावरचे काजळ
गेले पाण्यात वाहून

ठेव डोळ्यात अंजन
नजरा रोखून पाहिल
तुझ्या एका भेटीसाठी
जीव आतुर होईल

माझ्या सखे साजणी ग
अंजन घालणारी राणी
चेहरा झाक पदरात
हीच बोले राम वाणी

रामदास आण्णा, बुलडाणा
©® चे सर्व अधिकार आरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा