रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी पावस येथे आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख शेखर राणे आणि तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सिंधुदुर्गात नवनवीन उद्योग व्यवसाय यावेत अशी इच्छा देखील व्यक्त केली. मंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी वेगवेगळ्या योजना तसेच सिंधुदुर्गातील होतकरूंसाठी रोजगार निर्मितीचे काम केली होती. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियांकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.