You are currently viewing साळगाव ग्रामपंचायत मधून विजयी उमेदवारांचा खासदार, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख  संजय पडते यांच्याकडून सत्कार

साळगाव ग्रामपंचायत मधून विजयी उमेदवारांचा खासदार, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख  संजय पडते यांच्याकडून सत्कार

कुडाळ

साळगाव ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेच्या विजयी 5 उमेदवारांचा सत्कार खासदार श्री विनायकजी राऊत साहेब आमदार श्री वैभवजी नाईक साहेब व जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला यामध्ये बाबाजी सावंत तृप्ती सावंत सिद्धी मेस्त्री तेजस्विनी सावंत मानसी धुरी हे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते तसेच शाखाप्रमुख हेमंत सावंत संदीप सावंत रोहित सावंत दिलिप माळकर चेतन सावंत बंड्या कोरगावकर उपस्थित होते

साळगाव ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे पाच सदस्य निवडून आले यामध्ये सिद्धी मेस्त्री या 23 वर्षीय युवतीने विजय प्राप्त करत माजी जिल्हा परिषद सभापती दिनेश साळगावकर यांच्या पत्नी साळगावच्या माजी सरपंचा तेजस्विता साळगावकर यांचा 50 मतांचा फरकाने पराभव केला तर शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार सौ सुमेधा सावंत यांना निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी साळगाव मध्ये शिवसेनेचा भगवा फडकत असल्याचे चित्र दिसून आले यावेळी आमदार वैभवजी नाईक यांनी साळगावच्या सर्व कार्यकर्ते यांचे कौतुक केले व नवनिर्वाचित सदस्य यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत लोकांच्या सेवेत राहण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा