*नवनिर्वाचित सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे राजन नाईक,बबन बोभाटे यांचे आवाहन*
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ उद्या शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत. तरी कुडाळ तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.