कुडाळ :
ओरोस ग्रामपंचायतीवर ओरोस सह सिंधूनगरी वासियांनी भाजपच्या बाजूने निर्विवाद विजय प्राप्त केला आहे. भाजप सरपंच आशा गजानन मुरमुरे यांच्यासह 13 पैकी 10 भाजप सदस्यांना मतदारांनीह मताधिक्याने निवडून दिले आहे. भाजप सोबत युती झालेले शिंदे शिवसेना गटाचे प्रकाश देसाई यांना ही विजयाची संधी मिळाली आहे. भाजपचे संतोष वालावलकर व सुप्रिया वालावलकर दोघेही विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. तर नवतरुण सदस्य म्हणून सर्विस वर्षे गौरव बाळा घाडीगावकर यांचा विजय लक्षवेधी मानला जात आहे.
माजी सरपंच प्रीती देसाई यांची प्रतिप्रकाश देसाई यांनी शिंदे शिवसेना गटात जात भाजपचे प्रामाणिक युती केल्याने त्यांच्यावर विषयाची माळ पडली आहे. तर शिवसेनेचे अमित भोगले व योगेश तावडे या तरुण सदस्यांना निवडणुकीत यश मिळाले आहे. प्रभाग १ मधून अमित भोगले (शिवसेना) पूजा मालवणकर (भाजप), प्रभाग २ मधून सिंधूनगरी तेजश्री राऊळ (भाजप), सौ. राजश्री राऊळ (भाजप), सौ. भक्ती पळसंबकर (भाजप), प्रभाग ३ मधून सौ. प्रिया आजगावकर (भाजप), गौरव घाडीगावकर (भाजप), सौ. शमिका सावंत (भाजप), प्रभाग ४ मधून योगेश तावडे (शिवसेना), पांडुरंग मालवणकर (भाजप) कु. रसिका वंजारे (भाजप) व प्रभाग ५ मधून सौ. गौरी बोंद्रे (भाजप) व प्रकाश देसाई विजयी झाले आहेत.