सरपंचासह १३ पैकी १० भाजप सदस्य विजयी.
ओरोस
नगरपंचायतीचे स्वप्न पहाणार्या ओरोस ग्रामपंचायतीवर ओेरोस सह सिंधुनगरी वासीयांनी भाजपच्या बाजूने निर्विवाद कौल दिला. भाजप सरपंच आशा गजानन मुरमुरे यांच्यासह १३ पैकी १० भाजप सदस्यांना मतदारांनी मताधिक्याने निवडून दिले. भाजप सोबत युती झालेले शिंदे शिवसेना गटाचे प्रकाश देसाई यांनाही विजयाची संधी मिळाली! भाजपचे संतोष वालावलकर व सुप्रया वालावलकर हि उभयता या विजयाचे शिल्पकार ठरले!
या ओरोस सिंधुनगरी ग्रामपंचायतीवर नव तरुण सदस्य म्हणून सव्वीस वर्षिय गौरव बाळा घाडिगावकर यांचा विजय लक्षवेधी मानला जात आहे. तर माजी सरपंच प्रिती देसाई यांचे पती प्रकाश देसाई यांनी शिंदे शिवसेना गटात जात भाजपशी प्रामाणिक युती केल्याने त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तर शिवसेनेचे अमित भोगले व योगेश तावडे या तरुण सदस्याना या निवडणूकीत यश मिळाले.प्रभाग एक मधून अमित भोगले(शिवसेना), पुजा मालवणकर (भाजप), प्रभाग दोन मधून (सिंधुनगरी) तेजश्री राऊळ (भाजप),सौ राजश्री राऊळ (भाजप), सौ भक्ती पळसंबकर(भाजप), प्रभाग तीन मधून सौ प्रिया आजगावकर(भाजप), गौरव घाडीगावकर(भाजप), सौ शमिका सावंत(भाजप), प्रभाग चार मधून योगेश तावडे (शिवसेना),पांडुरंग मालवणकर (भाजप), कु. रसिका वंजारे (भाजप), व प्रभाग ५ मधून सौ गौरी बोंद्रे (भाजप),व प्रकाश देसाई विजयी झाले