You are currently viewing

*डॉ.शिवचरण उजैनकर फाउंडेशन, मुक्ताई नगरचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख, गांगलगाव लिखित अप्रतिम काव्यरचना*

*अश्रूंनी, पुसावं…!*

अंदा-धूंद…
वारे वाहते..!
भोवरी फिरे…
‘माणुस’की ची …!

आता,राहिले नाही…
इथे,तार-तम्य तसेे…!
‘साखरेस, भुलून कुणी….
इथे,निंब- पुजला नाही…!

का ? विषारली फळे….
विषघातकी मुळे….!
चोखंदळून सगळे…
मी,आकाश निहाळले…!

सैर-भेर झाले…
उधाण सगळे…!
माणूस विसरला…
अंगात सोहळे…!

स्मरणात कुणाच्या…
कुणी, जागत नाही….!
वेदना आरशाच्या…
कोणी,निहाळत नाही…!

खंत नसे, त्यास….
लवलेश काही…!
एकदा,
अश्रूंनी पुसाव….
हसूनी त्यास…..!

बबनराव वि आराख
गांगलगाव
7875701806

प्रतिक्रिया व्यक्त करा