विवाह बंधनात अडकण्यापूर्वी केले मतदान:सर्व स्तरावरून होत आहे कौतुक…
कुडाळ:
डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडण्यापूर्वी सोनवडे तर्फे हवेली येथील सोनाली तेरसे या युवतीने आपला पवित्र अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार बजावून लग्न समारंभासाठी रवाना झाली. सर्व श्रेष्ठदान मतदान हे तिने दाखवून दिले. कुडाळ तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सर्वत्रिक निवडणुका होत आहे आज रविवार 18 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकांबरोबर लग्नाचे मुहूर्त ही मोठ्या प्रमाणावर आहेत सोनवडे तर्फ हवेली येथील युती सोनाली तेरसे यांचा विवाह रविवारी पिंगुळी येथे होणार असून गोवा तांबोसी येथील वर आहे विवाह बंधनात अडकण्यापूर्वी युवती सोनाली तेरसे हीने नाही लोकशाहीने दिलेल्या सर्वात मोठा अधिकार म्हणजे मतदानाचा. हा मतदानाचा अधिकार तिने बजावून नंतर लग्न समारंभासाठी पिंगुळी येथे गेल्या तिच्या या कर्तव्यदक्ष वृत्तीची सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार आरोसकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल तेंडुलकर, ग्रामसेवक सविता आडेकर अन्य कर्मचारी यांनी सोनाली तेरेसे या युवतीला भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.