कणकवली
कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. गावाचे कारभारी ठरविण्यासाठी मतदार मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र होते. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणेने चोख व्यवस्था केली आहे. मतदार केंद्रापासून काहीअंतरावर विविध राजकीय पक्षांनी आपआपले बुथ लावले आहेत. याठिकाणी कायकर्ते गर्दी झाली आहे.
कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या व ४९ सरपंचपदासाठीची निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान शांततेत पार पडत आहे. तालुक्यातील बोर्डवे, कसवण- तळवडे, फोंडाघाट, वरवडे, पियाळी, साळीस्ते, वाघेरी, तिवरे,
तरंदळे, सावडाव, सातरल, बिडवाडी, कासरल, शेर्पे, साकेडी, हरकुळ बुद्रुक, कळसुली, दारिस्ते, शिवडाव, नडगिवे, ओसरगाव, सांगवे, तळेरे, माईण, कुंभवडे, करंजे,वागदे, कलमठ, नागवे, कासार्डे, हरकुळखुर्द, नाटळ, घोणसरी, लोरे, नाळंदगाव, कुरंगवणे, चिंचवली,हळवल, खारेपाटण, शिरवल, डामरे, दारोम, आशिये, करूळ, कोंडये, असलदे, दिगवळे, आयनल, नरडवे, कोळोशी, जानवलीया गावांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदार राजामध्ये मतदानाचा हक्क बजावताना उत्साह दिसून येत आहे. मतदान प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासन काम करत आहे.