इचलकरंजीत अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरात शिवाजीनगर पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील ओपन बार व मटका अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.यामध्ये एकूण १७ जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईने अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
इचलकरंजी शहरात अवैध व्यवसाय वाढत असल्याने त्याचा वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.याच अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी गस्त घालून मटका घेणा-यांसह खेळणा-या ७ जणांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणात सुमारे १९ जणांवर ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये शितल इजारे ,उत्तम लोहार , अजित कोरवी , अविनाश कोरवी , प्रभाकर एकांडे , गजानन आगलावे , मयुर आवळे , नागेश पेटकर ,जमीर म्हालदार , झाकीर मोमीन ,तानाजी आवळे , अविनाश शिंगारे , प्रमोद सुर्यवंशी ,सूरज साळुंखे , राजू बंडगर , सुरेश कुकडे ,उदय पाटील यांचा समावेश आहे.
तर नदीवेस जॅकवेल , रुग्णालय रोड परिसर , नामदेव भवन मैदान ,राणी बाग परिसर , भगतसिंग बाग परिसर ,कापड मार्केट परिसर याठिकाणी उघड्यावर दारु पिणा-या सुमारे १० जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे , पोलीस अंमलदार सागर चौगले ,उदय पाटील ,जक्रिया बाणदार , सुकुमार बरगाले ,पवन गुरव , सुनील बाईत ,अमित कांबळे यांच्या पथकाने केली.या कारवाईने अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या कारवाईचे स्वागत होत असून यामध्ये सातत्य ठेवावे ,अशी मागणी होत आहे.