You are currently viewing मळगाव येथे केबलसाठी खोदण्यात आलेल्या चरात घसरून दुचाकीला अपघात, दोघे जखमी…

मळगाव येथे केबलसाठी खोदण्यात आलेल्या चरात घसरून दुचाकीला अपघात, दोघे जखमी…

सावंतवाडी

अचानक समोर आडव्या आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात ब्रेक लावल्यामुळे दुसरी दुचाकी घसरून अपघात झाला. यात दुचाकी स्वारासह मागे बसलेली नवविवाहिता जखमी झाली. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मळगाव ब्रिज खाली घडली. दरम्यान एका खाजगी कंपनीकडून केबल टाकण्यासाठी रस्त्यात खोदण्यात आलेल्या चरामुळे हा अपघात घडला असून या ठिकाणी अनेक दुर्घटना घडत आहेत. मात्र संबंधित विभाग वारंवार मागणी करून सुद्धा तात्पुरती मलमपट्टी करत असल्याने त्या ठिकाणी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांसह वाहन चालकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघात ग्रस्त दुचाकी स्वार सावंतवाडीच्या दिशेने येत होता. यावेळी सर्विस रोड वरून येणारी एक दुचाकी त्याच्या अचानक समोर आली. त्यावेळी त्याने तिला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक मारला. मात्र त्याची दुचाकी केबलसाठी रस्त्यात खोदण्यात आलेल्या चरात घसरून तो जमिनीवर कोसळला. यात त्याच्यासह मागे बसलेली नवविवाहितता देखील जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी धावा-धाव करत दोघाही जखमींना मदत केली. मात्र समोरून आडवा आलेल्या दुचाकी स्वराने आपली काही चुकी नाही, असे सांगत तेथून पळ काढला.

प्रतिक्रिया व्यक्त करा