You are currently viewing देवगडातील ३३ ग्रामपंचायतीसाठी ४७५ कर्मचारी रवाना…

देवगडातील ३३ ग्रामपंचायतीसाठी ४७५ कर्मचारी रवाना…

देवगड

तालुक्यात होवू घातलेल्या ३३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ४७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. आज संबधित कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तालुक्यात ५ ग्रामपंचातीसह एकूण ८ सरपंच व १४६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरीत जागांसाठी १८ तारखेला निवडणूक प्रक्रिया होत आहे.
देवगड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये गवाणे, गोवळ, एकूण पाटगांव, आरे, चाफेड या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ३८ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३३ ग्रामपंचायतची निवडणुक होणार आहे. तर ८ सरपंच बिनविरोध झाल्याने ३० ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी निवडणुक होणार आहे. १४६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. रविवार १८ डिसेंबरला सकाळी ७.३० वा. पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. ३३ ग्रामपंचायतींच्या ९५ प्रभागांत मतदान होणार असून यासाठी ६ झोनल अधिकारी, ३३ निवडणुक निर्णय अधिकारी, ९५ केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस कर्मचारीसह ४७५ कर्मचारी मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी १०४ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून यामध्ये ५ अधिका- यांचा समावेश आहे. ३२ पोलिस कर्मचारी पालघर येथून बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. याशिवाय ३३ होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते ५.३० वा. पर्यंत मतदान कालावधी असून २० डिसेंबरला देवगड तहसील कार्यालयामध्ये सकाळी १० वा. पासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. ११ टेबलवर मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा