भारत देशाचा अपमान व पंतप्रधान नरेंद्र मोदी वरील वादग्रस्त विधानाचे उमटले कणकवलीत पडसाद
भाजप आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जाळला पुतळा
कणकवली
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी भारत देशाचा अपमान करणारे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे कणकवलीत तीव्र पडसाद उमटले. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गद्शनाखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बिलावर झरदारी भुट्टो यांचा पुतळा लाता बुक्क्यांनी तुडवत जाळला व वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध केला.यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार उपस्थित होते.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयासमोर हा पुतळा जाळण्यात आला. यावेळी नीम का पत्ता कडवा है बिलावल भट्टो भडवा है.. मोदी साहेब तुम पाकिस्तान मे घुसो हम तुम्हारे साथ है!! बिलावर भुट्टो चे करायचे काय ? खाली डोके वर पाय..! बिलावर भुतो हाय हाय…! भारत माता की जय..! वंदे मातरम..! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाकिस्तान ने भारत देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये, प्रदेश सदस्य सौ. प्रज्ञा ढवन, सौ राजश्री धुमाळे,तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके,सौ. प्राची करपे,श्री.गणेश तळगावकर,संतोष उर्फ पप्पू पुजारे,श्री.गुलाबराव चव्हाण, सागर राणे,आशिष वालावलकर,सुभाष मालंडकर, बाबू गायकवाड ,प्रदीप ढवन, संजय कामतेकर महेश सावंत, किशोर राणे, बाळा सावंत, बाळा पाटील,सागर राणे, मिलिंद चिंदरकर, पंढरी वायंगणकर, ओंकार सुतार,अभय राणे आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.