बांदा
बांदा येथे झालेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सात खेळाडूची जिल्हास्तरावर निवड झाली .१४ वर्षाखालील मुलांच्या गटात गोळाफेक स्पर्धेत सोहम मडवळ याने ९.७८ मि.गोळा फेकून तालुक्यात प्रथम आला.या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.१४ वर्षाखालील मुलांच्या गटात पांडूरंग पाटकर याने थाळीफेक स्पर्धेत २४.६२ मि.थाळी फेकून प्रथम क्रमांक प्राप्त केला .यशोमती रेडकर हिने २०० मि.धावणे यात प्रथम क्रमांक ,१७ वर्षाखालील मुलीच्या गटात अर्पिता राऊळ हिने ८०० मि.धावणे तसेच ,१०० मि.हर्डल्स मध्ये प्रथम क्रमांक मिळविला प्राची राऊळ हिने १०० मि.प्रथम क्रमांक तर आर्या कापडी हिने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला श्रध्दा राऊळ हिने ४०० मि.धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळविला. १४ वर्षे मुलीच्या गटात ४०० मि.धावणे रिले मध्ये तृतीय क्रमांक मिळविला या यशप्राप्त विद्यार्थ्यांचे सस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ प्राचार्या कल्पना बोवलेकर यानी अभिनंदन केले या सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक आर.के.राठोड यांनी मार्गदर्शन केले .